वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६-२७ च्या सूचनांचे नियोजन
ZP Online टीम · 09/11/2026 · 1 मिनिटे वाचन
कालावधी व वेळ: हे प्रशिक्षण दि. १३/११/२०२६ ते दि. २२/११/२०२६ या कालावधीत सकाळी ९:१५ ते ५:३० या वेळेत पार पडेल. (प्रशिक्षण स्थळी सकाळी ९:०० वा. पोहोचणे बंधनकारक आहे).
सुविधांबाबत: तालुकास्तर प्रशिक्षणासाठी चहा, अल्पोपहार, भोजन किंवा प्रवासभत्ता यांची कोणतीही शासकीय सोय असणार नाही; त्यामुळे प्रशिक्षणार्थींनी स्वतः जेवणाचा डबा व पाण्याची बॉटल सोबत आणावी.
इतर आवश्यक साहित्य: स्वाध्याय लेखनासाठी फुलस्केप कागद, पेन, वही, शिकवत असलेल्या विषयाची पाठ्यपुस्तके व प्रश्नपत्रिका सोबत ठेवाव्यात. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ चे अवलोकन करावे.
कला व क्रीडा शिक्षक विशेष सूचना: कला व क्रीडा शिक्षकांचे ७ दिवसांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण दि. १३/११/२०२६ ते १९/११/२०२६ दरम्यान होईल. त्यानंतर उर्वरित ३ दिवसांचे (२० ते २२ नोव्हेंबर) विभागीय प्रशिक्षण डायटमार्फत घेतले जाईल.
उपस्थिती व मूल्यांकन: पोर्टलवरून तासिका निहाय उपस्थिती घेतली जाईल. दिवसभरातील कोणत्याही तासिकेत गैरहजर राहिल्यास संपूर्ण प्रशिक्षण अपूर्ण मानले जाईल. प्रशिक्षणाच्या शेवटी लेखी परीक्षा (पूर्व व उत्तर चाचणी) होईल.
स्वाध्याय व प्रकल्प: प्रशिक्षण कालावधीत ५ स्वाध्याय पूर्ण करावे लागतील. उर्वरित ५ स्वाध्याय आणि प्रकल्प/कृती संशोधन/नवोपक्रम अहवाल प्रशिक्षण संपल्यानंतर ४० दिवसांच्या आत डायट, नांदेड येथे जमा करावा लागेल.
शेअर करा
संबंधित लेख
UDISE+ माहिती भरण्याबाबत परिपत्रक (नमुना)
शाळांची UDISE+ माहिती वेळेत आणि अचूक भरण्यासाठी परिपत्रकातील सूचनांचा नमुना सारांश.
12/10/2026 · 1 मिनिटे वाचन
शिष्यवृत्ती परीक्षा नोंदणीबाबत परिपत्रक (नमुना)
इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी करताना पाळायच्या सूचनांचा नमुना सारांश.
08/10/2026 · 1 मिनिटे वाचन